![]() |
Maharashtra Mukhyamantri Kisan Yojana |
{tocify} $title={Table of Contents}
Maharashtra Mukhyamantri Kisan Yojana
आपल्या देशातील बहुतांश कुटुंबांचा शेती हा मुख्य आणि पारंपरिक व्यवसाय आहे. याच प्रकारे आपल्या राज्यात शेती होते. बहुतांश शेतकरी गरिबी रेषेखाली स्वतःचे जीवन जगत असतो. शेतकऱ्यांकडे शेती व्यवसायाच्या व्यतिरिक्त दुसरे कुठलेही प्रकारच्या कमाईचे साधन नाही या कारणामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती कमजोर राहते.
अवकाळी पाऊस , दुष्काळ, हमी भाव न मिळणे यासारख्या परिस्तिथी मुळे खूप सारे शेतकरी शेती करण्याचे टाळतात त्याच्यामुळे भविष्यात याचा कृषी क्षेत्रावर मोठा दुष्परिणाम दिसत आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या या सर्व समस्यांचा विचार करून त्यांना आर्थिक सहाय्य करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र मुख्यमंत्री किसान योजना सुरु करण्याचा एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
Maharashtra Mukhyamantri Kisan Yojana details
योजनेचे नाव | महाराष्ट्र मुख्यमंत्री किसान योजना |
राज्य | महाराष्ट्र |
विभाग | कृषी विभाग |
योजनेची सुरुवात | २०२२ |
लाभार्थी | राज्यातील शेतकरी |
लाभ | प्रतिवर्ष ६०००/- रुपयांचे आर्थिक सहाय्य |
उद्देश्य | शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी करणे |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन / ऑफलाईन |
महाराष्ट्र मुख्यमंत्री किसान योजनेचा उद्देश
- राज्यातील गरीब शेतकऱ्यांची आर्थिक परीस्थिती सुधारणे .
- राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवणे
- शेतकऱ्यांचा सामाजिक, आर्थिक विकास करणे
- शेतकऱ्यांचे जीवन सुधारणे
- राज्यातील शेतकऱ्यांना सशक्त व आत्मनिर्भर बनविणे
- शेतकऱ्यांना तसेच इतर नागरिकांना शेती करण्यासाठी प्रोत्साहन देणे.
- शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी सावकारा कडून जास्त व्याज दराने पैसे घेण्याची आवश्यकता भासू नये.
- शेतकऱ्यांना स्वावलंबी बनविणे
- महाराष्ट्र मुख्यमंत्री किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती करणे
- राज्यातील शेतकऱ्यांचे कल्याण करणे.
महाराष्ट्र मुख्यमंत्री किसान योजनेचे लाभार्थी
राज्यातील सर्व शेतकरी महाराष्ट्र मुख्यमंत्री किसान योजनेचे लाभार्थी आहेत
महाराष्ट्र मुख्यमंत्री किसान योजनेअंतर्गत मिळणारी लाभाची रक्कम
महाराष्ट्र मुख्यमंत्री किसान योजनेद्वारे पात्र शेतकऱ्यांना प्रतिवर्ष 6000₹ रुपयांचे आर्थिक सहाय्य मिळते.
महाराष्ट्र मुख्यमंत्री किसान योजनेचे लाभ
- महाराष्ट्र मुख्यमंत्री किसान योजनेअंतर्गत राज्यातील पात्र शेतकऱ्यांना प्रतिवर्षी ६०००/- रुपयांचे आर्थिक सहाय्य करण्यात येणार आहे व लाभाची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.
- महाराष्ट्र मुख्यमंत्री किसान योजनेअंतर्गत लाभाची रक्कम शेतकरी कृषी कार्यात करू शकतील.
- महाराष्ट्र मुख्यमंत्री किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रतिवर्षी ६०००/- रुपयांचे आर्थिक सहाय्य करण्यात येणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना शेती कार्यासाठी कोणाकडून कर्ज घेण्याची आवश्यकता भासणार नाही.
- महाराष्ट्र मुख्यमंत्री किसान योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारेल.
- महाराष्ट्र मुख्यमंत्री किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास होईल
- राज्यातील शेतकरी सशक्त व आत्मनिर्भर बनतील
- या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी होतील.
- राज्यातील शेतकरी तसेच अन्य नागरिक शेती करण्यासाठी प्रेरित होतील.
- शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल.
महाराष्ट्र मुख्यमंत्री किसान योजनेच्या अटी
- मुख्यमंत्री किसान योजनेचा लाभ हा फक्त महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्याना दिला जाईल.
- महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही. ते या योजनेसाठी पात्र नाहीत.
- अर्जदार हा शेतकरी असणे आवश्यक आहे.
- अर्जदार शेतकऱ्याकडे स्वतः च्या मालकीची जमीन असणे आवश्यक आहे.
- शेतकरी वार्षिक उत्पन्न कमी असणे आवश्यक आहे.
- आर्थिक दृष्ट्या श्रीमंत शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला मिळणार नाही.
- अर्जदार शेतकरी अल्प भूधारक असणे आवश्यक आहे.
- शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे.
महाराष्ट्र मुख्यमंत्री किसान योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- राशन कार्ड
- निवास प्रमाणपत्र
- मोबाईल नंबर
- ई-मेल आयडी
- बँक खात्याचा तपशील
- पासपोर्ट साईज फोटो
- अर्जदार शेतकरी असल्याचे प्रमाणपत्र
- शपथपत्र
महाराष्ट्र मुख्यमंत्री किसान योजनेअंतर्गत ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत
अर्जदार शेकतकऱ्याला सर्वात प्रथम आपल्या जिल्हा कार्यालयातील कृषी विभागात जाऊन महाराष्ट्र मुख्यमंत्री किसान योजनेचा लाभ अर्ज घायचा आहे व अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत योग्य ती कागदपत्रे जोडायची आहेत व सदर अर्ज कार्यालय जमा करायचा आहे.
अशा प्रकारे तुमची महाराष्ट्र मुख्यमंत्री किसान योजनेअंतर्गत ऑफलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
महाराष्ट्र मुख्यमंत्री किसान योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत
महाराष्ट्र मुख्यमंत्री किसान योजनेंतर्गत अर्ज करू इच्छिणाऱ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. कारण सध्या महाराष्ट्र सरकारने कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत ही योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या योजनेची अर्ज प्रक्रिया सुरु करे पर्यंत तुम्हाला काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.