भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील ट्वेन्टी-२० मालिका संपली. आता गुरुवारपासून दोन्ही संघांतील वनडे मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेत तीन सामने खेळवण्यात येणार आहे. पण या वनडे मालिकेतील सामने नेमके किती वाजता सुरु होणार आहेत, याची माहिती आता समोर आली आहे
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला सामना ६ ऑक्टोबरला लखनौ येथे खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर या मालिकेतील दुसरा वनडे सामना हा ९ ऑक्टोबरला रांचीमध्ये खेळवण्यात येईल. त्यानंतर या मालिकेतील अखेरचा आणि तिसरा वनडे सामना हा ११ ऑक्टोबरला नवी दिल्ली येथे खेळवण्यात येणार आहे. या मालिकेसाठी भारताने निवडक खेळाडूंचा संघ जाहीर केला आहे. कारण भारताचा मुख्य संघ हा ६ ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियातील ट्वेन्टी-२० मालिकेसाठी रवाना होणार आहे. त्यामुळे जे खेळाडू विश्वचषकाच्या संघात नाहीत त्यांना यावेळी वनडे संघात सामील करून घेण्यात आले आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील वनडे सामन्यांचा टॉस हा दुपारी १.०० वाजता होणार आहे. टॉस झाल्यावर दोन्ही कर्णधार आपला ११ खेळाडूंचा संघ जाहीर करतील. त्यानंतर अर्ध्या तासाने सामन्याला सुरुवात करण्यात येणार आहे. त्यानुसार हा सामना दुपारी १.३० वाजता सुरु करण्यात येणार आहे. हा सामना साधारणपणे ८ ते साडे आठ तास सुरु राहील. त्यामुळे हा सामना रात्री १०.०० पर्यंत चालू राहील, असे म्हटले जात आहे. त्यामुळे उद्याचा पूर्ण दिवस चाहत्यांना ही मेजवानी मिळणार आहे. यावेळी भारतीय संघाचे कर्णधारपद हे शिखर धवनकडे सोपवण्यात आले आहे, तर संघाचे उपकर्णधारपद हे श्रेयस अय्यरकडे असेल.
दक्षिण आफ्रिका वनडेसाठी भारतीय संघ: शिखर धवन (कर्णधार), श्रेयस अय्यर (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, रजत पाटीदार, राहुल त्रिपाठी, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, मुकेश कुमार , आवेश खान , मो. सिराज, दीपक चहर.