मैदानाच्या कोणत्याही कोपऱ्यात चेंडू मारण्याची क्षमता असलेला फलंदाज सूर्यकुमार यादव आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषकात भारतासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावेल, असे मत दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज डेल स्टेनने व्यक्त केले. तसेच आफ्रिकेचा दिग्गज फलंदाज एबी डिव्हिलियर्सप्रमाणे सामन्यावर प्रभाव पाडण्याची सूर्यकुमारमध्ये क्षमता असल्याचेही स्टेनने नमूद केले.
‘‘सूर्यकुमार मैदानाच्या कोणत्याही कोपऱ्यात चेंडू मारू शकतो आणि त्याची फलंदाजी पाहून मला एबी डिव्हिलियर्सची आठवण होते. तो भारताचा डिव्हिलियर्स होऊ शकतो. सूर्यकुमारमध्ये सामने जिंकवून देण्याची क्षमता आहे. तसेच तो सध्या अप्रतिम लयीत असल्याने ट्वेन्टी-२० विश्वचषकात त्याच्या कामगिरीकडे सर्वाचे लक्ष असेल,’’ असे स्टेन म्हणाला.
Tags:
क्रिकेट