सौरव गांगुली BCCI मधून बाहेर पडणार, जय शहा नाही तर कोण होणार अध्यक्ष ?

 बीसीसीआयमध्ये आता बदलाचे वारे वाहायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता भारताचे माजी कर्णधार सौरव गांगुली बीसीसीआयमधून बाहेर पडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पण त्यानंतर बीसीसीआयचे अध्यक्षपद जय शहा यांच्याकडे जाणार नसल्याचेही स्पष्ट झाले आहे. आता बीसीसीआयच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा एक माजी क्रिकेटपटू विराजमान होणार असल्याचे समोर आले आहे.


गांगुली हे तीन वर्षे बीसीसीआयच्या अध्यक्षपदी होते, पण आता त्यांना आयसीसीच्या अध्यक्षपदाची स्वप्न पडायला लागली आहेत. पण ते बीसीसीआयच्या अध्यक्षपदावर असले तर त्यांना आयसीसीमध्ये जाता येणार नाही. त्यामुळे ते बीसीसीआयमधून बाहेर पडणार आहेत. पण यावेळी जय शहा यांना बीसीसीआयच्या अध्यक्षदावर जाता येऊ शकते. पण सध्याच्या घडीला जय शहा हे बीसीसीआयच्या अध्यक्षपदी जाणार नसल्याचे समोर आले आहे.


गांगुली यांच्यानंतर आता बीसीसीआयच्या अध्यक्षपदी भारताच्या १९८३ साली विश्वचषक जिंकलेल्या संघातील रॉजर बिन्नी यांची निवड होणार असल्याचे जवळपास ठरलेले आहे. येत्या १८ ऑक्टोबरला एका बैठकीमध्ये हा निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे आता अजून एक माजी क्रिकेटपटू हे बीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान होणार आहेत.


बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी यावेळी बरेच दावेदार होते. कांरण गांगुली हे अध्यक्षपद भूषवणार नाहीत, हे स्पष्ट झाले होते. गांगुली यांना यावेळी एक वेगळी ऑफरही देण्यात आली होती. त्यानुसार त्यांना बीसीसीआयमधील अजून एक पद देण्यात येणार होते.पण गांगुली यांनी हे पद नाकारले. कारण बीसीसीआयचे अध्यक्षपद भूषवल्यावर अजून त्या खालचे कोणतेही पद भूषवायचे नाही, हे गांगुली यांचे यापूर्वीच ठरले होते. त्यानुसार गांगुली आता बीसीसीआयमधून बाहेर पडणार हे स्पष्ट झाले आहे. त्याचबरोबर यावेळी आता बीसीसीआयमध्ये मोठे बदल होणार आहेत. कारण बीसीसीआयमध्ये आता खजिनदार या पदावरील व्यक्ती बदलण्यात येणार आहे आणि या पदावर आता एक राजकारणी व्यक्तीची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे आता बीसीसीयमध्ये नेमके कोणते बदल होणार आहेत, जाणून घ्या...

Post a Comment

Previous Post Next Post