Ajinkya Rahane : दसऱ्याला गोड बातमी! रहाणेंच्या घरी चिमुकल्याचं आगमन

 Ajinkya Rahane Welcome Baby Boy : दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर भारताचा माजी उपकर्णधार अजिंक्य रहाणेने एक आनंदाची बातमी दिली. अजिंक्य रहाणे दुसऱ्यांदा बाप झाला असून याची माहिती त्याने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून दिली. याचबरोबर त्याने आपली पत्नी राधिका आणि मुलाची प्रकृती उत्तम असल्याचेही सांगितले. या आनंदवार्तेनंतर चाहत्यांना त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
अजिंक्य रहाणे आपल्या मुलाच्या जन्मानंतर सोशल मीडियावर लिहितो की, 'आज सकाळी मी आणि माझी पत्नी राधिकाने आमच्या मुलाचे या जगात स्वागत केले. बाळ आणि बाळाची आई दोघेही स्वस्थ आहेत. तुमच्या सर्वांच्या प्रेमासाठी आणि आशीर्वादासाठी सर्वांचे मनापासून आभार.' यावर रहाणेची फ्रेंचायजी केकेआरने देखील प्रतिक्रिया देताना अजिंक्यचे अभिनंदन केले आणि केकेआरची छोटी जर्सी तयार होत आहे असे सांगितले.


योगायोगाची!योगायोगाची गोष्ट म्हणजे ऑक्टोबर 2019 मध्ये अजिंक्य रहाणे पहिल्यांदा पिता झाला होता. त्याने आणि राधिकाने त्यांची मुलगी आर्याला जन्म दिला होता. लग्नानंतर पाच वर्षांनी त्यांना हे पहिले अपत्य झालं होते.Post a Comment

Previous Post Next Post