T20 World Cup आधी भारतीय संघासाठी आनंदाची बातमी! भारताचा हा गोलंदाज ऑस्ट्रेलियाला जाण्यासाठी तयार

क्रिकेट न्युज मराठी

 टी-२० विश्वचषकापूर्वी (T20 World Cup 2022) भारतीय संघासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. जसप्रीत बुमराह संघातून बाहेर झाल्यानंतर भारताला गोलंदाजी बाजूची फार चिंता सतावत होती. भारतीय संघ पंधराव्या खेळाडूविना ऑस्ट्रेलियासाठी रवाना झाला. पण आता भारताचा हा घातक गोलंदाज ऑस्ट्रेलियाला जाण्यासाठी सज्ज झाला आहे.

भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने (Mohammad Shami) राष्ट्रीय क्रिकेट अकादमी, बेंगळुरू येथे त्याची फिटनेस चाचणी पास झाला असून आता तो ऑस्ट्रेलियाला जाण्यासाठी सज्ज झाला आहे. शमीचा विश्वचषकातील बॅकअप खेळाडूंमध्ये समावेश करण्यात आला होता, परंतु दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या घरच्या मालिकेमुळे आणि त्यानंतर कोरोना पॉझिटिव्ह असल्याने तो मुख्य संघासोबत ऑस्ट्रेलियाला गेला नाही. शार्दुल ठाकूर उद्या ऑस्ट्रेलियाला रवाना होणार असल्याचेही वृत्त आहे. दीपक चहरने दुखापतग्रस्त होऊन आपल्या सर्व शक्यता आधीच संपुष्टात आणल्या आहेत.

विश्वचषक खेळण्याच्या उद्देशाने घरी बसलेल्या मोहम्मद शमीचा घरच्या मालिकेत समावेश करण्यात आला होता, मात्र हा ३२ वर्षीय खेळाडू कोरोनामुळे खेळू शकला नाही. गुजरात टायटन्सला आयपीएल २०२२ चे चॅम्पियन बनवण्यात यूपीच्या या वेगवान गोलंदाजाची मोठी भूमिका होती. २०२१ मध्ये खेळल्या गेलेल्या शेवटच्या टी-२० विश्वचषकानंतर शमीने भारतासाठी लहान फॉरमॅटमध्ये एकही सामना खेळलेला नाही.

मोहम्मद शमी पूर्णपणे तंदुरुस्त असणे ही भारतीय संघासाठी खरोखरच चांगली बातमी आहे कारण अष्टपैलू गोलंदाज दीपक चहर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नुकत्याच संपलेल्या वनडे मालिकेनोतर संघातून बाहेर पडला आहे. १५-सदस्यीय संघाचा भाग असलेल्या चहरने पाठीच्या समस्येसंबंधित सांगितले, त्यानंतर त्याला वैद्यकीय पथकाची देखरेखीखाली बेंगळुरू येथील एनसीएमध्ये पाठवण्यात आले.

टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, आर. अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग

Post a Comment

Previous Post Next Post