ऑस्ट्रेलियात होणारा आगामी टी-२० वर्ल्डकपला वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज शिमरन हेटमायर मुकणार आहे. वेस्ट इंडिज संघात त्याच्या जागी शमराह ब्रुक्सचा समावेश करण्यात आला आहे. क्रिकेट वेस्ट इंडिजने या बाबतची घोषणा केलीय.
आयसीसी टी-२० वर्ल्डकपला १६ ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियात सुरुवात होत आहे. यासाठी जगभरातील संघ ऑस्ट्रेलियात दाखल होत आहे. वेस्ट इंडिजचा संघ देखील ऑस्ट्रेलियाला रवाना झाला. वर्ल्डकपसाठी संघाची घोषणा झाली तेव्हा हेटमायरचा देखील समावेश करण्यात आला होता. ऑस्ट्रेलियाला जाण्यासाठी हेटमायरने कौटुंबीक कारण देत त्याची फ्लाइट रीशेड्यूल केली होती.
बदलण्यात आलेल्या वेळेनुसार हेटमायर १ ऑक्टोबरच्या ऐवजी ३ ऑक्टोर रोजी ऑस्ट्रेलियासाठी जाणारे विमान पकडणार होता. त्याच्यासाठी क्रिकेट बोर्डाने एक सीट देखील बुक केली होती. मात्र हेटमायरने क्रिकेट बोर्डाला कल्पना दिली की तो रीशेड्यूल केलेली फ्लाइट पकडू शकत नाही.
बोर्डाने हे देखील स्पष्ट केले की, ऑस्ट्रेलियाला पोहोचण्यात जर आणखी उशिर झाला तर अडचणी आल्या असत्या. त्यामुळेच आमच्याकडे खेळाडू बदलण्या शिवाय कोणताही पर्याय नव्हता. वर्ल्डकप सारख्या स्पर्धेत संघाच्या तयारीसाठी अशा प्रकारच्या तडजोडी करता येणार नाहीत. असे असले तरी हेटमायर आमच्यासाठी आंतरराष्ट्रीय टी-२० संघाचा भाग असेल