टी20 विश्वचषकाच्या इतिहासात यंदाची टीम इंडियाची बॅटिंग लाईन अप सर्वात दमदार : रवी शास्त्री


 ऑस्ट्रेलियाच्या भूमीत 16 ऑक्टोबरपासून टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) ही भव्य स्पर्धा रंगणार आहे. टीम इंडिया ऑस्ट्रेलियाला पोहोचली असून सराव सामने खेळण्यासही सुरुवात केली आहे. दरम्यान यंदा भारताने उतरलेला टी20 विश्वचषकासाठीचा संघ हा टी20 वर्ल्डकप इतिहासातील भारताकडून उतरवण्यात आलेला सर्वात दमदार फलंदाज असणारा संघ असल्याची प्रतिक्रिया माजी क्रिकेटर आणि माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी दिली आहे. मुंबई प्रेस क्लब येथे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.Post a Comment

Previous Post Next Post