सराव सामने मिळवून देणार विश्वचषक.... १५ वर्षांनंतर भारत चॅम्पियन होणार! टी-२० विश्वचषकाचे पहिले जेतेपद भारतीय संघाने पटकावले होते. परंतु त्यांनतर भारतीय संघ या विश्वचषकाच्या जेतेपदाची प्रतीक्षा करत आहे. यंदा ही भारत तेवढ्याच ताकदीनिशी या अटीतटीच्या स्पर्धेसाठी उतरेल. जेतेपद पटकावण्याच्या हेतूने संघाची जोरदार तयारी देखील सुरु आहे. यावर्षी संघ टी-२० विश्वचषकाचे जेतेपद पटकावेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे आणि याचा संबंध २०११ मधील एकदिवसीय विश्वचषकाच्या जेतेपदाशी जोडण्यात आला आहे

२०११ मध्ये भारताने टी-२० विश्वचषक जिंकला होता. २८ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर टीम इंडियाने एकदिवसीय विश्वचषक जिंकला. त्यावेळी संघाचा कर्णधार असलेल्या महेंद्रसिंग धोनीने नुकतीच पत्रकार परिषद घेतली. यामध्ये तो म्हणाला की, ओरियो बिस्किटे आम्हाला टी-२० विश्वचषक जिंकवू शकला असता. धोनी म्हणाला की, २०११ मध्ये भारताने वर्ल्ड कप जिंकण्यापूर्वी ओरियो लाँच केले होते. जर ओरिओ पुन्हा लॉन्च झाला तर यावर्षी भारत चषक जिंकेल. चला तर मग ओरियो पुन्हा लाँच करू.

एक मोठा संबंध

महेंद्रसिंग धोनी ओरिओला टी-२० विश्वचषक जिंकण्याचा भाग्यवान चार्म मानत असेल, पण यापेक्षाही एक मोठा योगायोग आहे. त्यामुळे टीम इंडिया विश्वचषक पटकावेल असे मानले जात आहे. टी-२० विश्वचषकापूर्वी भारताला दोन सराव सामने खेळायचे आहेत. पहिला सामना १७ ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलिया विरुद्ध गाबा येथे होणार आहे. ऑस्ट्रेलिया टी-२० चा विश्वविजेता देखील आहे. त्यानंतर याच मैदानावर टीम इंडिया १९ ऑक्टोबरला न्यूझीलंडशी भिडणार आहे.

२०११ मध्येही हा प्रकार घडला होता

२०११ मध्येही भारतीय संघाने विश्वचषकापूर्वी दोन सराव सामने खेळले होते. पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध होता. त्यावेळी ऑस्ट्रेलियाचा संघ वनडेचा गतविजेता होता. यानंतर संघाची न्यूझीलंडशी टक्कर झाली. विश्वचषकापूर्वी टीम इंडिया ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडविरूध्द खेळणार आहे, हा योगायोग आहे. हा योगायोग बघितला तर हा संघ पुन्हा एकदा विश्वचषकाचे जेतेपद पटकावू शकतो.

१५ वर्षांपासून विजेतेपदाची प्रतीक्षा

भारतीय संघ १५ वर्षांपासून टी-२० वर्ल्ड चॅम्पियन बनण्याची वाट पाहत आहे. २००७ मध्ये झालेल्या स्पर्धेच्या पहिल्या वर्षी संघाने महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली विजेतेपद पटकावले होते. त्यानंतर तीन टूर्नामेंटमध्ये उपांत्य फेरीपर्यंत संघ पोहोचू शकला नाही. २०१४ मध्ये संघ अंतिम फेरीत आणि २०१६ मध्ये उपांत्य फेरीत पराभूत झाला होता. गेल्या वर्षीच्या स्पर्धेत पुन्हा एकदा भारताला उपांत्य फेरीतही प्रवेश मिळवता आला नव्हता.Post a Comment

Previous Post Next Post